शिक्षण
शिक्षण क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रात सेवा भारतीची फिरती प्रयोग शाळा, बाल वाचनालये, अभ्यासिका, शिकवणी वर्ग यांच्या माध्यमातून एकूण १५८ सेवाकार्ये चालतात.
आरोग्य
पश्चिम महाराष्ट्रात सेवा भारतीची २७० ग्राम आरोग्य रक्षक, ६० रुग्णोपयोगी साहित्य केंद्र, ९ आरोग्य केंद्र, आणि ७ फिरते दवाखाने या माध्यमातून एकूण ३४६ सेवाकार्ये आरोग्य क्षेत्रात सुरु आहेत.
सामाजिक उपक्रम
पश्चिम महाराष्ट्रात सेवा भारतीचे एकूण ३३ सामाजिक उपक्रम सुरु आहेत, ज्यात किशोरी विकास प्रकल्प, अन्नपूर्णा योजना, आपद्प्रसंगी साहाय्य, करिअर मार्गदर्शन, योग वर्ग यांचा समावेश आहे.
स्वावलंबन
संस्कार वर्ग, स्वावलंबन व व्यवसाय प्रशिक्षण प्रकल्प, संस्था प्रशिक्षण अश्या ३१ सेवाकार्यांच्या माध्यमातून सेवा भारती स्वावलंबन क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे.